केप टाउन : गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणी सतावत असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. साखर उद्योगाची संभाव्य अनुदानाबाबत सरकारसोबत चर्चा सुरू आहे. साखर उद्योगाकडून आपल्या वार्षिक उत्पादनाच्या एक तृतीयांश साखरेचे रुपांतर जैव इंधनात करू शकतो.
दक्षिण आफ्रिका साखर संघाच्या मतानुसार, सद्यस्थितीत उद्योगाकडील २.१ मिलियन टन वार्षिक साखर उत्पादनापैकी ८,००,००० टनाची निर्यात तोट्यात करण्यात येत आहे. शुगर मास्टर प्लॅनवर स्वाक्षरी केल्यानंतर सरकार, शेतकरी आणि औद्योगिक वापरकर्ते, किरकोळ विक्रेत्यांकडून जैव इंधन उत्पादन योजनेवर चर्चा सुरू झाली आहे. ही योजना स्वस्त आयातीमुळे निर्माण होणारे आर्थिक संकट कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. द
साखर संघाचे कार्यकारी संचालक ट्रिक्स त्रिकम यांनी सांगितले की, या योजनेत औद्योगिक वापरकर्ते आणि किरकोळ विक्रेत्यांसोबतच्या विविध प्रकारच्या करारांचा समावेश आहे. त्यातून मार्चमध्ये समाप्त झालेल्या वर्षात स्थानिक मागणी १४ टक्क्यांपर्यंत वाढण्यास मदत झाली आहे. जैव इंधन उत्पादनामुळे साखर कारखान्यांच्या महसुलात भर पडू शकते. त्यांना यासाठी चांगले धोरण, आकर्षक अनुदान मिळण्याची गरज आहे. देशातील काही कंपन्यांना जैव इंधन कार्यक्रमाचा लाभ मिळू शकतो. यामध्ये देशातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी टोंगोट ह्यूलेट, असोसिएटेड ब्रिटिश फूड्स आणि आरसीएल फूड्स यांच्या स्थानिक युनिट्सचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेच्या पूर्व भागात उसाचे उत्पादन घेतले जाते. उद्योगात साधारणतः ८५,००० कर्मचारी काम करतात. गेल्या दोन दशकापासून उद्योगात घसरण सुरू आहे. वार्षिक साखर उत्पादनात २५ टक्क्यांपर्यंतची घसरण दिसून आली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link









