कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याला को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यावतीने सर्वोत्कृष्ट को-जनरेशन पॉवर प्लांटचा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथील कार्यक्रमात ‘को-जन इंडिया’चे संस्थापक, खा. शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील व संचालक मंडळाने स्वीकारला. यावेळी को-जन इंडियाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे संयुक्त सचिव दिनेश जगदाळे, नरेंद्र मोहन, सुभाष कुमार व जनरल मॅनेजर संजय खताळ,
कारखान्याचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक प्रवीणसिंह पाटील, बाबासाहेब पाटील, प्रवीण भोसले, राजेंद्र पाटील, धनाजीराव देसाई, श्रीपती पाटील, उमेश भोईटे, एकनाथ पाटील, मधुकर देसाई, धोंडीराम मगदूम, के. ना. पाटील, अशोक कांबळे, युवराज वारके, प्रदीप पाटील, सुनिलराज सूर्यवंशी, विकास पाटील, कार्यकारी संचालक के. एस. चौगुले, एस. जी. किल्लेदार, चिफ अकाउंटंट एस. ए. कुलकर्णी, को-जन मॅनेजर व्ही. के. मिरजी, प्रोजेक्ट मॅनेजर महेश सलगर आदी उपस्थित होते.












