श्रीलंका सरकारकडून साखर माफियांवर कारवाईसाठी पथक तैनात

कोलंबो : चार स्थानिक कारखान्यांमध्ये उत्पादित होणारी ब्राउन साखर विकण्यास अडचणी निर्माण झाल्यामुळे सरकारने, गुप्तपणे साठवलेला साठा बाजारात आणण्यात काही माफिया सहभागी आहेत का याची चौकशी करण्यासाठी एक पथक तैनात केले आहे, असे एका मंत्र्यांनी सांगितले. पेलवाट्टे, सेवानागाला, इथिमाले आणि गलोया येथील कारखान्यांमध्ये एकूण साखरेच्या गरजेपैकी फक्त ११ टक्के साखर स्थानिक पातळीवर उत्पादित केली जाते.

याबाबत, उपव्यापार मंत्री आर. एम. जयवर्धने यांनी डेली मिररला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “आम्ही उर्वरित साठा का विकू शकत नाही याचा अभ्यास करत आहोत. आम्ही साखर आयात करणे थांबवले आहे. परवानाधारक आयातदारांद्वारे आता ब्राऊन साखर आयात केली जात नाही. तरीही, आम्हाला शंका आहे की काही साठा इतरत्र साठवून ठेवला गेला आहे. हे साठे चुकीच्या व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात बाजारात आणले जात आहेत. आम्हाला असे वाटते की पांढऱ्या साखरेसह ब्राऊन साखरेचा साठा आयात करून इतरत्र साठवला जात होता का? पांढरी साखर रासायनिक प्रक्रियेद्वारे ब्राऊन करून जास्त किमतीत विकली जात होती? जबाबदार लोकांचा शोध घेणे आमच्यासाठी कठीण आहे. तरीही, आम्ही ते शोधण्यासाठी एक पथक तैनात केले आहे.

जयवर्धने म्हणाले की, आम्ही साखर संशोधन संस्था, सीमाशुल्क आणि ग्राहक व्यवहार प्राधिकरण (सीएए) यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. दोन सरकारी कंपन्यांनी ऊस पीक खरेदी न केल्यामुळे शेतकरी आंदोलन करत असल्याने स्थानिक साखर उद्योग सध्या संकटात आहे. शेतकरी त्यांचा सतत निषेध करत आहेत. कंपन्यांचे खाजगीकरण करण्याची काही योजना आहे का? असे विचारले असता त्यांनी सांगितले की अशी कोणतीही योजना नाही. आम्ही त्यांना सरकारी संस्था म्हणून चालवू.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here