मुंबई : भारतीय शेअर बाजार निर्देशांक १७ जुलै रोजी घसरला. सेन्सेक्स ३७५.२४ अंकांनी घसरून ८२,२५९.२४ वर तर निफ्टी १००.६० अंकांनी घसरून २५,१११.४५ वर बंद झाला.टेक महिंद्रा, इंडसइंड बँक, इन्फोसिस, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, विप्रोमध्ये सर्वात जास्त घसरण झाली. तर टाटा कंझ्युमर, टाटा स्टील, हिंडाल्को इंडस्ट्रीज, ट्रेंट, एम अँड एममध्ये वाढ झाली.
गुरुवारी भारतीय रुपया १३ पैशांनी घसरून ८६.०७ प्रति डॉलरवर बंद झाला, तर बुधवारी ८५.९४ वर बंद झाला होता. मागील सत्रात, सेन्सेक्स ६३.५७ अंकांनी वाढून ८२,६३४.४८ वर तर निफ्टी १६.२५ अंकांनी वाढून २५,२१२.०५ वर बंद झाला होता.