शेअर बाजारात घसरण : सेन्सेक्स ८३ अंकांनी घसरला, तर निफ्टी २४,८०० च्या खाली बंद

मुंबई : इस्राइल-इराण यांच्यात सुरु असलेले युद्ध आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या सावध भूमिकेमुळे गुरुवारी, १९ जून रोजी भारतीय शेअर बाजार निर्देशांक घसरले.सेन्सेक्स ८२.७९ अंकांनी घसरून ८१,३६१.८७ वर बंद झाला, तर निफ्टी १८.८० अंकांनी घसरून २४,७९३.२५ वर बंद झाला.

निफ्टीमध्ये टाटा कंझ्युमर, आयशर मोटर्स, एम अँड एम, विप्रो आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजमध्ये तेजी पाहायला मिळाली तर अदानी पोर्ट्स, बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स, टेक महिंद्रा आणि अदानी एंटरप्रायझेसमध्ये घसरण झाली. बुधवारीही सेन्सेक्स १३८.६४ अंकांनी घसरून ८१,४४४.६६ वर तर निफ्टी ४१.३५ अंकांनी घसरून २४,८१२.०५ वर बंद झाला होता. शेअर बाजारात घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here