शेअर बाजार वधारला : सेन्सेक्स २५६ अंकांनी वधारला, निफ्टी २५,१०० च्या वर

मुंबई : जागतिक स्तरावरील सकारात्मक संकेतांचा परिणाम भारतीय शेअर बाजारातही पाहायला मिळाला. भारतीय बेंचमार्क निर्देशांक ९ जून रोजी चौथ्या दिवशी वाढले. सेन्सेक्स २५६.२२ अंकांनी वधारून ८२,४४५.२१ वर बंद झाला, तर निफ्टी १००.१५ अंकांनी वधारून २५,१०३.२० वर बंद झाला.

बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक, अ‍ॅक्सिस बँक, जिओ फायनान्शियल, ट्रेंट हे निफ्टीमधील प्रमुख शेअर वधारले तर आयसीआयसीआय बँक, टायटन कंपनी, एम अँड एम, अदानी पोर्ट्स, ईटरनल यामध्ये घसरण पाहायला मिळाली.शुक्रवारच्या ८५.६३ च्या बंदच्या तुलनेत सोमवारी भारतीय रुपया ८५.६३ प्रति डॉलरवर स्थिर राहिला. शुक्रवारी सेन्सेक्स ७४६.९५ अंकांनी वधारून ८२,१८८.९९ वर तर निफ्टी २५२.१५ अंकांनी वधारून २५,००३.०५ वर बंद झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here