मुंबई : जगावरील युद्धाचे सावट कमी झाल्यामुळे आणि कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे बुधवारी भारतीय शेअर बाजाराने उसळी घेतली. त्यामुळे बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसून आली. बुधवारी सेन्सेक्स ७००.४० अंकांनी वधारून ८२,७५५.५१ वर बंद झाला, तर निफ्टी २००.४० अंकांनी वधारून २५,२४४.७५ वर बंद झाला.
टायटन कंपनी, इन्फोसिस, एम अँड एम, ग्रासिम इंडस्ट्रीज, जेएसडब्ल्यू स्टील हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वधारले तर भारत इलेक्ट्रॉनिक्स, कोटक महिंद्रा बँक, आयशर मोटर्स, अॅक्सिस बँक, ओएनजीसी हे तोट्यात होते. सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. त्यामध्ये ऑटो, कंझ्युमर ड्युरेबल्स, आयटी, टेलिकॉम, हेल्थकेअर, मीडिया १-२ टक्क्यांनी वधारले. मंगळवारी सेन्सेक्स १५८.३२ अंकांनी वधारून ८२,०५५.११ वर बंद झाला, तर निफ्टी ७२.४५ अंकांनी वधारून २५,०४४.३५ वर बंद झाला.बुधवारी भारतीय रुपया ८६.०९ प्रति डॉलरवर बंद झाला, तर मंगळवारी तो ८५.९८ वर बंद झाला.