कोल्हापूर : साखर कारखान्यांना अनेक वर्षे ऊस पुरवठा करणारे वाहतूकदार आणि तोडणीदार यांना शासनाचे कोणतेही संरक्षण नसून त्यांचे महामंडळ स्थापन करण्यासाठी विधानसभेत पहिल्याच अधिवेशनात मागणी करू, अशी ग्वाही माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली. वाकरे फाटा (ता. करवीर) येथे कुंभी कासारी साखर कारखान्याच्या ऊस तोडणी व वाहतूकदारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. कुंभी बँकेचे माजी संचालक दौलू संतू पाटील अध्यक्षस्थानी होते.
यशवंत बँकेचे माजी अध्यक्ष एकनाथ पाटील म्हणाले, कुंभी कारखाना सक्षमपणे चालवण्याची क्षमता केवळ चंद्रदीप नरके यांच्याकडेच आहे. आपला प्रतिनिधी विधानसभेत असेल तर राज्य सरकारचे सहकार्य लाभते. त्यामुळे चंद्रदीप नरके यांना विधानसभेत पाठवण्यासाठी कामाला लागा. यावेळी वाहतूकदार संघटनेचे सदस्य दत्तात्रय पाटील, ‘कुंभी’चे संचालक अनिल पाटील, विलास पाटील, अनिश पाटील, बाजीराव शेलार, वाहतूकदार संघटना अध्यक्ष अशोक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. गोकुळ संचालक अजित नरके, ‘कुंभी कासारी’चे उपाध्यक्ष राहुल खाडे, वाहतूकदार संघटनेचे संजय पाटील, विजय पाटील, उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.











