नवी दिल्ली : भारताचा यंदा सप्टेंबरमध्ये समाप्त होणाऱ्या हंगामात साखर निर्यात घटून ५०-६० लाख टनापर्यंत राहील अशी शक्यता आहे. उद्योगातील तज्ज्ञांच्या मतानुसार २०२०-२१ या काळात निर्यात उच्चांकी ७१ लाख टनापर्यंत झाली होती.
उद्योगातील प्रमुख संस्था इस्मातर्फे आयोजित वेबिनारमध्ये बोलताना इंडियन शुगर एक्झिम कॉर्पोरेशनचे (आयएसईसी) कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अधीर झा यांनी सांगितले की, २०२०-२१ या आर्थिक वर्षात भारताकडून ५०-६० लाख टन निर्यात होईल अशी शक्यता आहे.
घसरणीबाबत विचारले असता ते म्हणाले, भारताने चालू हंगामात ७० लाख टन साखर निर्यातीची गरज नाही. कारण देशात इथेनॉल उत्पादनासाठी उसाच्या रसाचा वापर केला जात आहे. थायलंडकडून अधिक निर्यात होण्याची शक्यता असल्याने भारताची साखर निर्यात कमी राहील. आम्हाला २०२१-२२ मध्ये ७१ लाख टन साखर निर्यातीची गरज नाही. आमचा अतिरिक्त साठ्याचे व्यवस्थापन योग्य आहे. इंधानाच्या वाढत्या किमतीमुळे वाहतूक खर्च वाढून भारताला चांगल्या दराने साखर निर्यातीची आवश्यकता आहे.
आयएसईसीचे कार्यकारी संचालक आणि सीईओ म्हणाले, आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर एक वर्षाच्या तुलनेत सर्वोत्तम आहेत. आयातदारांच्या मागणीचे हे सुरुवाती स्तरावरील संकेत आहेत. साखर कारखाने पुरवठ्याचे करार लवकर करण्यास तयार आहेत.
आयएसईसीची स्थापना वर्ष १९६९ मध्ये साखर उद्योगातील दोन प्रमुख संस्था नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड (एनएफसीएसएफ) आणि भारतीय साखर कारखाना संघाचे (इस्मा) साखर आणि उपपदार्थांच्या निर्यातीसाठी करण्यात आली होती.
चांगली मागणी आणि सरकारकडून चांगले आर्थिक सहाय्य मिळाल्याने गेल्या महिन्यात समाप्त झालेल्या हंगाम २०२०-२१ मध्ये भारताची साखर निर्यात २० टक्क्यांनी वाढून आजवरच्या उच्चांकी ७१ लाख टनापर्यंत पोहोचली आहे. त्याआधीच्या वर्षी, २०१९-२० मध्ये साखरेची निर्यात ५९ लाख टन झाली होती. इस्माने वर्तविलेल्या अंदाजानुसार २०२१-२२ मध्ये साखर उत्पादन ३.१ कोटी टन होण्याची शक्यता आहे.
साखरेची उपलब्धता ३.९५ कोटी टनापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सुरुवातीचा साखर साठा ८५ लाख टनाचा असेल. देशांतर्गत साखरेचा खप २.६५ कोटी टनापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामध्ये निर्यातीच्या ६० लाख टनाचा समावेश असेल. साखर हंगामाच्या समाप्तीपर्यंत ७० लाख टनाचा साठा राहील.
पेट्रोलसोबत इथेनॉल मिश्रणाबाबत इस्माने सांगितले की, पेट्रोलियम वितरण कंपन्यांना ३.२५ अब्ज लिटरच्या पुरवठ्यासह नोव्हेंबरअखेर संपणाऱ्या इथेनॉल वितरण वर्ष २०२०-२१ मध्ये याचे पेट्रोलमधील ८.५ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
२०२१-२२ या इथेनॉल हंगामात पेट्रोलियम पदार्थ वितरण कंपन्यांना ४.२५ अब्ज लिटर पुरवठ्यासह मिश्रण १० टक्क्यांच्या स्तरापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

















