कानपूर : भारत सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा म्हणाले कि, साखर कारखानदारांनी केवळ साखर तयार करण्यावर अवलंबून राहू नये. साखर कारखान्यांनी फोर्टिफाइड साखर, इथेनॉल आणि अन्य उपपदार्थांच्या उत्पादनावरही भर दिला पाहिजे. नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेला सुरुवात झाली आहे. यावेळी नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक प्रोफेसर नरेंद्र मोहन आणि चोप्रा यांनी परिषदेचे उद्घाटन केले.
प्रोफेसर नरेंद्र मोहन म्हणाले कि, साखर उद्योगाने देशाच्या विकासात नेहमीच महत्वाची भूमिका बजावली आहे. आता इथेनॉल उत्पादनातही देश अग्रेसर होत आहे आणि त्यामुळे देशाच्या परकीय चलनाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. या परिषदेत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि थायलंडमधील शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. दरम्यान, या परिषदेव्यतिरिक्त एका एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. या ‘एक्स्पो’मध्ये ३८ हून अधिक स्टॉल्सवर विविध तंत्रज्ञान आणि उपकरणे प्रदर्शित करण्यात आली होती. त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
















