केप टाउन : अन्नधान्याच्या वाढत्या किमती दरम्यान दक्षिण आफ्रिकेतील ग्राहकांना आता साखरेच्या चढ्या किमतीचाही सामना करावा लागणार आहे. साउथ आफ्रिका शुगर असोसिएशनने (Sasa) उसाच्या किमती निश्चित करण्यासाठी रिफाईंड आणि ब्राऊन शुगरचे दर वाढविण्याची नोटीस जारी केली आहे. साखरेच्या किमतीमधील वाढ ३१ ऑगस्टपासून लागू होणार आहे. Sasa ने गेल्या महिन्यात उद्योगातील घटकांना पाठविलेल्या नोटिसीमध्ये म्हटले आहे की, ही दरवाढ उसाच्या उत्पादनातील वाढता खर्च, वाहतूक, वितरण, ऊर्जा व इतर संबंधीत घटकांच्या वाढीमुळे करणे अत्यावश्यक बनले आहे. ३१ ऑगस्टपासून साखरेच्या किमती सरासरी ४.५ टक्के वाढतील. मात्र, ही दरवाढ उत्पादन आणि पॅकच्या आकारानुसार भिन्न असू शकतात.
यादरम्यान, शुगर मास्टर प्लानच्या तीन वर्षीय करारांतर्गत दोन वर्षानंतर साखर क्षेत्रातील प्रमुख टोंगोट ह्यूलेट, इलोवो आणि आरसीएलने घोषणा केली आहे की, गेल्या महिन्यात ग्राहकांना पाठविलेल्या एका अधिसूचनेनुसार ऑगस्ट महिन्याच्या अखेपर्यंत त्यांच्या उत्पादनांची किंमत ४.५ आणि ५.५ टक्के यांदरम्यान वाढेल. शुगर इंपोर्टर्स असोसिएशन ऑफ साउथ आफ्रिकाचे चेअरमन क्रिस एंगेलब्रेच यांनी सांगितले की, यामुळे किरकोळ दरात ७ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ होईल.












