ब्राझीलच्या प्रमुख मध्य-दक्षिण प्रदेशात सप्टेंबरच्या पहिल्या सहामाहीत साखर उत्पादन गेल्या वर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत १५.७२ टक्क्यंनी वाढून ३.६२ दशलक्ष मेट्रिक टनांवर पोहोचले आहे. युनिका उद्योग समुहाने गुरुवारी ही माहिती दिली. पहिल्या सहामाहीत ४५.९७ दशलक्ष टन ऊस गाळप झाले आहे. मागील वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत ही वाढ ६.९४ टक्के आहे, असे युनिकाने म्हटले आहे.
उसाच्या प्रति टन एकूण साखर उत्पादन (टीआरएस) १५४.५८ किलोग्रॅम होता, जो गेल्यावर्षी याच कालावधीत नोंदवलेल्या १६०.०७ किलोग्रॅमपेक्षा थोडा कमी होता. तथापि, ही पातळी आजपर्यंतच्या वर्षाच्या सरासरी टीआरएसपेक्षा जास्त होती. ती १३४.०८ किलोग्रॅम प्रति टन आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत ३.९३ टक्के कमी दर्शवते.
युनिकाच्या सेक्टर इंटेलिजन्सचे संचालक लुसियानो रॉड्रिग्ज यांनी सांगीतले की साखर उत्पादनासाठी वाटप केलेल्या उसाचे प्रमाण मध्य-दक्षिणमध्ये सरासरी ०.८ टक्के घटले आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या सहामाहीत सरासरी ५४.२ टक्के वरून सप्टेंबरच्या पहिल्या सहामाहीत ५३.५ टक्क्यांपर्यंत कमी झाले. सप्टेंबरच्या पहिल्या सहामाहीत इथेनॉलचे उत्पादन एकूण २.३३ अब्ज लिटर होते. ते मागील कालावधीतील २.४५ अब्ज लिटरपेक्षा कमी आहे, असे युनिकाने म्हटले आहे.
यापैकी ३९० दशलक्ष लिटरपेक्षा जास्त इथेनॉल मक्यापासून बनवले गेले. ते मागील वर्षीच्या तुलनेत धान्यापासून बनवलेल्या इथेनॉलमध्ये जवळपास १६ टक्क्यांची वाढ दर्शवते.