देशात ३० एप्रिलपर्यंत २५६.९० लाख टन साखरेचे उत्पादन: ISMA

नवी दिल्ली : इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी प्रोड्युसर्स असोसिएशन (इस्मा)ने दिलेल्या माहितीनुसार, भारतात २५६.९० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. ३० एप्रिलपर्यंत अजूनही सुमारे १९ साखर कारखाने कार्यरत आहेत. इस्माच्या म्हणण्यानुसार, सध्या उत्तर प्रदेशात सुमारे १० साखर कारखाने कार्यरत आहेत, त्यापैकी ८ पश्चिम उत्तर प्रदेशात आहेत. हे कारखाने पुढील ७ ते १० दिवस सुरू राहतील, अशी अपेक्षा आहे. उत्तर प्रदेशात उसाचे चांगले उत्पादन मिळाल्याने उसाची उपलब्धता वाढली आहे, ज्यामुळे काही कारखाने त्यांचे कामकाज सुरू ठेवू शकले. याव्यतिरिक्त, हंगामाच्या दुसऱ्या सहामाहीत साखरेचे चांगले उत्पादन झाल्यामुळे साखर उत्पादनात वाढ झाली आहे.

सध्या तामिळनाडूमध्ये मुख्य हंगामात सुमारे ८ कारखाने सुरू आहेत. तर, महाराष्ट्रात, पुणे जिल्ह्यातील एक साखर कारखाना मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू राहाण्याची अपेक्षा आहे. दक्षिण कर्नाटक आणि तामिळनाडूमधील काही कारखाने जून/जुलै ते सप्टेंबर या विशेष हंगामात त्यांचे कामकाज पुन्हा सुरू करतील आणि यामुळे उत्पादन वाढविण्यास मदत होईल. इस्माच्या मते, ऐतिहासिकदृष्ट्या, कर्नाटक आणि तामिळनाडू एकत्रितपणे विशेष हंगामात सुमारे ४-५ लाख टन साखरेचे योगदान देतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here