मनीला : फिलीपाईन्सच्या साखर उत्पादनात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात १३.१७ टक्क्यांची वाढ झाली आहे. साखर नियामक प्रशासनाकडील (एसआरए) डिसेंबरपर्यंत कच्च्या साखरेचे उत्पादन ४,६१,४८६ मेट्रिक टनापर्यंत (एमटी) पोहोचले आहे. गेल्यावर्षी समान कालावधीत हे उत्पादन ४,०७,७७० मेट्रिक टन होते. फिलीपाईन्समध्ये दरवर्षी सप्टेंबर महिन्यात साखर हंगाम सुरू होतो. त्याची समाप्ती ऑगस्ट महिन्यात होते.
एसआरएकडील आकडेवारीनुसार, साखरेचा मिल गेट दर प्रती ५० किलो बॅगला ११.२९ टक्क्यांनी वाढून १६८०.७६ झाला आहे. कच्च्या साखरेची मागणी ६.०४ टक्क्यांनी वाढून ४,३२,१८१ मेट्रिक टन झाली आहे. एकूण ऊसाचे गाळप ११.०४ टक्क्यांनी वाढून ५.७ मिलिटन मेट्रिक टन झाले आहे. चालू हंगामात कच्च्या साखरेचे उत्पादन २.०९९७ मिलियन मेट्रिक टन होण्याची शक्यता आहे.
एसआरएने चालू गळीत हंगामातील साखरेचे सर्व उत्पादन “बी” बाजारासाठी मंजूर केली आहे. अमेरिकेला निर्यात करणाऱ्या साखरेसाठी “ए”, देशांतर्गत वापराच्या साखरेसाठी “बी”, साठवणूक करण्याच्या साखरेसाठी “सी”, अमेरिका वगळता इतर देशांत निर्यातीसाठी “डी” आणि स्थानिक प्रोसेसर्ससाठीच्या साखरेसाठी “ई” असे वर्गीकरण करण्यात आले आहे. हंगाम २०२०-२१ साठी कच्च्या साखरेचे उत्पादन २.१४३ मिलियन मेट्रिक टनापर्यंत पोहोचले आहे. जे यापूर्वीच्या हंगामात २.१४५ मिलियन मेट्रिक टनापेक्षा थोडे कमी होते.












