ट्युनिस : ट्युनीशियामध्ये साखरेच्या तुटवड्यामुळे किमतीत वाढ होत आहे. सर्वसामान्य लोकांसोबतच खाद्यपदार्थ उत्पादनांवरही दरवाढीचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत.
व्यापार आणि उद्योग महासंघाच्या बेन एरस विभागीय कार्यालयाचे महासचिव सोहेल बुखारिस यांच्या म्हणण्यानुसार, ट्युनीशियातील साखरेचा साठा समाप्त झाला आहे. त्यांनी सांगितले की, ७ सप्टेंबरपासून देशातील गोदामे रिकामी झाली आहेत. बुखरिस म्हणाले की, ट्यूनीशियाने अलिकडेच अल्जेरियातून २०,००० टन साखर आयात करण्याच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. आणि १८ सप्टेंबर रोजी भारताकडून येणारी ३०,००० टन साखर बिजेरटे बंदरावर पोहोचेल. ट्रेड युनियनिस्टने दावा केला की, साखरेच्या कमतरतेमुळे ऑगस्टच्या अखेरीस बिस्किट, ज्युस आणि शीतपेय आदींचे उत्पादन बंद करण्यात आले आहे.















