चामराजनगर, कर्नाटक : जिल्ह्याला अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. ऊसासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खरेतर जिल्ह्यात मार्च-एप्रिल यांदरम्यान पहिल्यांदा पाऊस होता. यावर्षी जिल्ह्यात १९ मार्च रोजी पहिल्यांदा पाऊस झाला होता. त्यातून मोठे नुकसान झाले आहे.
अप्पर जिल्हाधिकारी कात्यायनी यांनी सांगितले की, जिल्ह्यात १९ मार्चपासू ५ एप्रिलपर्यंत झालेल्या पावसाने आतापर्यंत ४६ घरांची हानी झाली आह. पावसामुळे १४९.३३ हेक्टरमधील केळी, ३३.५० हेक्टरमधील ऊस आणि मक्का पिकांना फटका बसला आहे. चामराजनगर आणि गुंडलूपेट तालुक्यात ५७ वीज खांब, एक ट्रान्सफार्मरचे नुकसान झाले आहे. कात्यायनी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना घर आणि पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्यात आली आहे.












