ऊस पिकाच्या किडीपासून बचावाबाबत मार्गदर्शन

बागपत : चौगामा विभागातील भडल तथा निरपुड गावात साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी ऊस पिकावरील विविध रोगांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. वेळीच रोगांवर किटकनाशक फवारणी न केल्यास नुकसान होऊ शकते असा सल्लाही त्यांनी दिली.
खतौली साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी चौगामा विभागातील भडल, निरपुडा, इदरीशपूर आदी गावात शेतकऱ्यांच्या बैठकी घेतल्या. यावेळी कारखान्याचे ऊस विभागाचे महा व्यवस्थापक कुलदीप राठी यांनी शेतकऱ्यांना सांगितले की, याहवामानात ऊस पिकावर बोरर रोगाचा फैलाव दिसून येत आहे. या किडीमुळे पिकाच्या वरच्या भागात प्रादुर्भाव होत असल्याने पिकाची वाढ खुंटते आणि ऊस वाळायला लागतो. त्यामुळे पिकाच्या उत्पादनात घट येते. त्यामुळे अशा प्रकारच्या किडीचा फैलाव दिसून आला तर ती पाने तोडून जमिनीत गाडून टाकावीत. अशा उपायांनीच या रोगाला आळा घातला येईल.  याशिवाय उसावर कोरोजेनचे फवारणी करावी.
कारखान्याचे अधिकारी वरिष्ठ व्यवस्थापक विनेश कुमार, डॉ. अशोक कुमार, उप व्यवस्थापक धीरज मलिक, अनुज मलिक, हरिओम, दुष्यंत राणा, विनोद कुमार, गौरव कुमार आदींनी शेतकऱ्यांना शेतात पिकांवरील किडीची माहिती देऊन मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here