नगीना : द्वारिकेश साखर कारखान्याकडून पूरग्रस्त क्षेत्रातील ऊसाची पाहणी करण्यात आली. यावेळी जवळपास अडीच हजार हेक्टरमधील ऊस पिक पुरात नष्ट झाल्याचे आढळले आहे. आगामी काळात शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनात २० टक्के घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, डोंगराळ भागातील नद्यांच्या वेगवान प्रवाहामुळे साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील खो, ऊनी, बान व गांगन नदीला आलेल्या पुरात नदीकाठावरील शेती पाण्यात बुडाली. बहुतांश ऊस शेती पाणी साठल्याने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ऊस उत्पादकांच्या म्हणण्यानुसार, यंदा जोरदार पावसाने उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी कमी होईल. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यावेळी ऊस पिकावर लाल सड रोग गतीने पसरला आहे. साखर कारखान्याचे अधिकारी कार्यक्षेत्रातील पुरामुळे नष्ट झालेला ऊस आणि लाल सड रोग यामुळे चिंतेत आहेत.
साखर कारखान्याचे मुख्य महाव्यवस्थापक रमेश परशुरामपुरीया यांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी लाल सड रोगावर नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी ब्लिचिंग पावडरचा वापर करावा. रोगग्रस्त ०२३८ प्रजातीच्या उसाची लागवड न करता प्रगत को ०- १५०२३, को ०- ११८, को ०- ९८०१४ तसेच को ०-१७२३१ या प्रजातींची लागवड करावी असे सांगण्यात आले आहे.












