साओ पाउलो : ब्राझीलच्या ऊस उद्योग संघटना युनिका (UNICA)ने जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पावसामुळे ऊस तोडणीवर नकारात्मक परिणाम झाल्याचे म्हटले आहे. तसेच एकूण इथेनॉल उत्पादनात घट झाली आहे, परंतु मक्यापासून इथेनॉल उत्पादनात वाढ होत आहे. ब्राझीलच्या दक्षिण-मध्य प्रदेशातील कारखान्यांनी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात ३८.७८ दशलक्ष मेट्रिक टन ऊस गाळप केला आहे. गेल्या वर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत हे गाळप २१.४९ टक्क्यांनी कमी आहे. एक एप्रिलपासून सुरू झालेल्या चालू गाळप हंगामाच्या सुरुवातीपासून एकूण ऊस तोडणी १६३.५७ दशलक्ष मेट्रिक टनांवर पोहोचली आहे. गेल्यावर्षी, २०२४ मधील याच कालावधीच्या तुलनेत ही ऊस तोडणी १४.३३ टक्के कमी आहे.
जूनच्या पहिल्या पंधरवड्यात या प्रदेशातील कारखान्यांनी १.७८ अब्ज लिटर (४७०.२३ दशलक्ष गॅलन) इथेनॉलचे उत्पादन केले. या उत्पादनात १.१ अब्ज लिटर निर्जल इथेनॉलचा समावेश होते. हे उत्पादन १७.९७ टक्के कमी आहे. तर ६७७.५९ दशलक्ष लिटर निर्जल इथेनॉलचे उत्पादन झाले. याचे प्रमाण २६.९७ टक्के कमी आहे. दोन आठवड्यांच्या कालावधीत मक्का इथेनॉलचे उत्पादन २५६.९८ दशलक्ष लिटर किंवा एकूण उत्पादनाच्या २० टक्के होते, जे गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १६.५४ टक्क्यांनी जास्त होते.
चालू पीक हंगामाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण इथेनॉल उत्पादन ७.५ अब्ज लिटरवर पोहोचले आहे, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा १४.२१ टक्के कमी आहे. उत्पादनात ४.९४ अब्ज लिटर हायड्रो इथेनॉलचा समावेश होता, जे १३.०२ टक्के कमी होते. आणि २.५६ अब्ज लिटर निर्जल इथेनॉलचा यात समावेश होता, जे उत्पादन १६.४१ टक्के कमी होते. मक्का इथेनॉलचे उत्पादन १.८ अब्ज लिटर होते, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा २२.०२ टक्के जास्त होते.
जूनच्या पहिल्या पंधरवड्यात या भागातील कारखान्यांनी १.२६ अब्ज लिटर इथेनॉलची विक्री केली, जी गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १३.९२ टक्के कमी आहे. विक्रीमध्ये ४६०.०१ दशलक्ष लिटर निर्जल इथेनॉलचा समावेश होता, जो १०.१८ टक्के कमी होता आणि ८०३.९५ दशलक्ष लिटर हायड्रो इथेनॉलचा समावेश होता, जो १५.९३ टक्के कमी होता. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात देशांतर्गत विक्रीत ७७९.९ अब्ज लिटर हायड्रो इथेनॉलचा समावेश होता, जो १६.५८ टक्के कमी होता आणि ४४२.६१ दशलक्ष लिटर निर्जल इथेनॉलचा समावेश होता, जो ११.६४ टक्के कमी होता.
चालू पीक हंगामाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण इथेनॉल विक्री ७.०२ अब्ज लिटर झाली आहे, जी ४.४७ टक्क्यांनी कमी आहे. विक्रीमध्ये ४.५२ अब्ज लिटर हायड्रो इथेनॉलचा समावेश आहे, जो ७.४१ टक्याने कमी आहे आणि २.५१ अब्ज लिटर निर्जल इथेनॉलचा समावेश आहे. यात १.३२ टक्के वाढ झाली आहे.