मंड्या : ऊस दरवाढ करण्यास राज्य सरकार उशीर करीत असल्याच्या निषेधार्थ कर्नाटक राज्य रयत संघाने (KRRS) १९ डिसेंबर रोजी मंड्या बंदचे आवाहन केले आहे. याबाबतचे वृत्त द हिंदूने प्रकाशित केले आहे.
KRRS ने सांगितले की, शेतकरी गेल्या सहा महिन्यांपासून अधिक काळ ऊस दरवाढीच्या मागणीसाठी आंदोलन करीत आहेत. मात्र, सरकारच्यावतीने आतापर्यंत कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. KRRS च्या म्हणण्यानुसार, सरकारच्या या भूमिकेविरोधात या विभागातील जवळपास १५,००० हून अधिक शेतकरी मंड्यामध्ये एकत्र येतील आणि मोर्चा काढणार आहेत.















