ऊस उत्पादकांनी चिंता करू नये, ऊस तोडणी नियोजनबद्ध पद्धतीने होणार : प्रशांत बोत्रे-पाटील यांचे आश्वासन

पुणे : गेल्या वर्षी कारखान्यांची सुरुवात उशिरा झाल्यानंतरही गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड (हिरडगाव युनिट क्र. ४) च्या गळीत हंगामात समाधानकारक ऊस गळीत झाले. यंदा कारखान्याने वेळेत सुरुवात करत नियोजनबद्ध तोडणीचे व साखर उत्पादनाचे पूर्व तयारीसह काम सुरू केले असल्याचे ओंकार शुगर ग्रुपचे संचालक प्रशांत बोत्रे-पाटील यांनी सांगितले. गौरी शुगरच्या २०२५-२६ या गळीत हंगामाच्या मिल रोलर पूजन कार्यक्रमात प्रशांत बोत्रे-पाटील बोलत होते. हा पूजन विधी ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.

गौरी शुगर कारखान्याकडे श्रीगोंदा, शिरूर व आजूबाजूच्या भागातील शेतकरी ऊस पुरवठा करत आहेत. यंदा ऊस उत्पादकांना योग्य दर मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे आश्वासन देत बोत्रे-पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी ऊस तोडणीचे नियोजन वेळेत व सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमास कारखान्याचे जनरल मॅनेजर रोहिदास यादव, हिरडगावचे सरपंच रामदास बनकर, उपसरपंच चिमाजी दरेकर, ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here