बँकॉक : थायलंडचे Office of the Cane and Sugar Board (OCSB) च्या कार्यालयाने केलेल्या अनुमानानुसार, २०२२-२३ मध्ये पिक वर्षासाठी ऊस उत्पादन केवळ १.९ टक्के वाढून ९३.८ मिलियन टन झाले आहे. दुष्काळामुळे हे उत्पादन पूर्वानुमानापेक्षा कमी झाले आहे.
OCSB चे महासचिव पनुवत त्रियांक कुंसरी यांनी सांगितले की, सरकारला सुरुवातीला ऊस उत्पादन १०० टनापेक्षा अधिक होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, दुष्काळ आणि उच्च उत्पादन खर्चामुळे कमी उत्पादन झाले आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी ऊस पिक उत्पादनासाठी येणारा अधिकाधिक खर्च पाहून साबुकंदाचे (कसावा) उत्पादनाकडे आपले लक्ष वळवले आहे.
गेल्या वर्षी एक डिसेंबर ते ६ एप्रिल या कालावधीत ५७ साखर कारखान्यांना ९३.८ मिलियन टनापैकी ६३.१ मिलियन टन ताज्या उसाचा पुरवठा करण्यात आला होता. तर उर्वरीत ३०.७ मिलियन टन ऊस जळालेला होता. सरकारकडून ऊस जाळण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीही शेतकरी ऊस जाळण्यास अधिक पसंती देतात. कारण, असा ऊस लगेच तोडता येतो. त्यासाठी कमी कामगारांची गरज भासते. OCSB च्या म्हणण्यानुसार, थायलंडमधील ऊस मळे मुख्यत्वे स्थलांतरित तोडणी कामगारांवर अवलंबून आहेत.












