औरंगाबाद : जालन्याजवळ ऊस संशोधन केंद्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते.
याबाबत, लोकमत टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, शरद पवार म्हणाले की, या ऊस संशोधन केंद्रासाठी सुमारे १०० एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. येत्या सहा महिन्यांत याचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. पवार म्हणाले की, संस्थेचे दुसरे केंद्र नागपुरात उभारण्यात येणार आहे. तेथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मदतीने जमीन संपादित करण्यात आली आहे. ऊस संशोधन केंद्रामध्ये कमी पाण्यामध्ये नवीन वाण घेऊन उसाची लागवड कशी करता येईल यावर संशोधन केले जाईल. यासाठी शेतकऱ्यांना सर्व तांत्रिक मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.















