बरेली : उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एका कारखान्याचा ऊस दुसऱ्या कारखान्याने पळविल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे कारखान्यांच्या गाळपावर परिणाम झाला आहे. बरेलीत याबाबतची घटना समोर आली आहे. मुख्य सचिव बीना मिणा यांच्याकडे साखर कारखान्याकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनुसार, त्यांना दिलेला ऊस उत्तराखंडमधील साखर कारखान्यांकडून नेण्यात येत आहे. तर दुसरीकडे सेमीखेडा साखर कारखान्याचे सरव्यवस्थापक शादाब आलम यांनी सांगितले की, त्यांच्या विभागातील जवळपास १८ लाख क्विंटल ऊस इतर कारखान्यांकडे गाळपास गेला आहे. त्यामुळे आता त्यांना गाळपात अडचणी उद्भवल्या आहेत.
मुख्य सचिवांनी अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेऊन जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह तसेच सीसीओंसह इतर ऊस विभागातील अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. सेमीखेडा सरकारी साखर कारखान्याचा ऊस इतर खासगी कारखाने आणि उत्तराखंडमधील साखर कारखान्याने पळवल्याने मुख्य सचिवांनी दोन अधिकाऱ्यांचे वेतन रोखण्यासह इतर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यानंतर ऊस विभागाने सक्रिय होऊन सीमेवरील तपासणी अधिक कडक करण्यात आली आहे.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.


















