हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
सतना (मध्य प्रदेश) : चीनी मंडी
सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून गरिबांना वितरीत करण्यासाठी आणण्यात आलेली १३ लाख रुपयांची साखर गैरप्रकारातून लांबवण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. सरकारनी गोदामांपर्यंत पोहचलेली ही साखर रास्त भाव धान्य दुकानांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच पळवण्यात आली आहे. या संदर्भात चौकशी सुरू करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
प्रकरणाच्या चौकशीसाठी मंडई परिसरातील सरकारी गोदामाला एसडीएम अधिकाऱ्यांनी भेट दिली. तपासणीमध्ये गोदामातील साठ्यामध्ये तफावत असल्याचे आढळून आले. तसेच काही अत्यावश्यक कागदपत्रेदेखील उपलब्ध नसल्याचे दिसले आहे. प्राथमिक चौकशीत यात गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याची पडताळणी रास्त भाव धान्य दुकानांमधील साखरेची माहिती घेऊन केली जाणार आहे. दरम्यान, या प्रकारामुळे प्रशासनाची गोदामातील आणि वाहतुकीच्या एकूण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यापूर्वी कोटर तहसील कार्यालयात खाद्यान्न घोटाळा झाला होता. त्या महाघोटाळ्याची चौकशी झाल्यानंतरही आद्याप संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही.
लाभार्थींना साखरच मिळाली नाही. जे. पी. कुशवाह यांनी जिल्हाधिकाऱ्यांना गरजूंसाठी साखर उपलब्ध झाली नसल्याचे सांगितले. मार्च माहिन्यात गरिबांना किंवा अति गरिबांना वितरीत करण्यात येणारी साखरच उपलब्ध झाली नसल्याचे सांगण्यात आले. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी रघुराजनगरचे एसडीएम पी. एस. त्रिपाठी यांना चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर त्रिपाठी यांच्या पथकाने सरकारी गोदामाची भेट देऊन पाहणी केली. यावेळी तहसीलदार आर. पी. त्रिपाठी आणि डीएम नान विख्यात हिंडोलियादेखील उपस्थित होते.
३१ मार्चला रवाना झाले ट्रक
३१ मार्च रोजी ट्रक क्रमांक एमपी १९-जीए १३९२ मधून ५६ क्विंटल साखर माझगाव क्षेत्रातील ५१ रास्त भाव धान्य दुकानांसाठी पाठवण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी १ एप्रिल रोजी ट्रक क्रमांक एमपी १०-जीए ३२४० मधून चार क्विंटल साखर कोठी क्षेत्रातील सात रास्त भाव धान्य दुकानांना पाठवण्यात आली. या दुकानांमध्ये चौकशी केली असता. तेथेही साखर पोहोचली नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. मुळात २५ किलोमीटवरील कोठी क्षेत्रात एक दिवस उलटून गेल्यानंतरही साखर पोहोचली नसल्याने गैरप्रकाराचा संशय बळावला आहे.
तक्रारदार काय म्हणतात…
घटनास्थळी उपस्थित असलेल्या तक्रारदाते जे. पी. कुशवाह यांनी चौकशीत सांगितले की, ३१ मार्चनंतर आमची माणसे या परिसरातील २४ तास तपासणी करत आहेत. या परिसरातून एकही ट्रक साखर घेऊन पुढे गेलेला नाही. गोदाम प्रशासनातून देण्यात येत असलेली माहितीच खोटी आहे, असा दावा त्यांनी केला आहे. ही साखर खुल्या बाजारात विकण्यात आली आहे. त्यात वाहतुकीसह गोदाम प्रशासनातील सगळ्यांचा हात आहे.
साखर साठ्यातही गोंधळ
चौकशीत एसडीएम यांनी तपासलेल्या साखर साठ्यात गैरप्रकार असल्याचे आढळले आहे. एक वर्षापूर्वीचा साखरेचा स्टॉक असलेल्या गोदामाची माहिती देण्यास गोदाम प्रशासन तयार नव्हते. कागदावरील माहितीनुसार गोदामात ५१ पोती साखर असणे अपेक्षित होते. पण, तेथे केवळ ४० साखरेची पोती होती. या विषयी चौकशी केली तर, एक एप्रिलला ही साखर पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, या साखरेचे कोणतेही रेकॉर्ड जागेवर मिळाले नाही. ११ पोती साखर कोठून, कोठे पाठवण्यात आली याची माहिती मिळत नसल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे नव्या साखर साठ्यातील तपासणीमध्ये १२६० पोती साखर असणे अपेक्षित होते. तेथे दोन पोती अतिरिक्त साखर सापडली आहे. त्यामुळे साखरेच्या साठ्यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे दिसत आहे.
गरिब कुटुंबांसाठीची साखर
जिल्ह्यातील ६५ हजार गरिब कुटुंबांसाठी ही साखर सतना येथे पाठवण्यात आली होती. मात्र, अजूनही या गरीब कुटुंबांना साखरेचा गोडवा अनुभवायला मिळालेला नाही. चौकशीमध्ये कोणताही कर्मचारी नीट माहिती देत नसल्याचे आढळून आले आहे.
येथेही साखर पोहोचली नाही
कोठी आणि सोहावल क्षेत्रातील शिवपूर, नारायणपूर, कल्हारी, धौरहरा, बचबई, डिलौरा आणि मुडहा येथेही साखर पोहोचली नसल्याचे आढळले आहे. गोदामातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या गावांसाठी आदल्या दिवशीच साखर पाठवण्यात आली आहे. तेथील रास्त भाव धान्य दुकानांचे मॅपिंग आणि रूट चार्टही पहायला मिळालेली नाही. एसडीएम पी. एस. त्रिपाठी यांनी, प्राथमिक चौकशीत साखरेचा गैरव्यवहार झाल्याचे म्हटले आहे. आता माझगाव येथील दुकानांची पाहणी करून चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


















