बीड : सर्वसामान्य शेतकऱ्यांचा संसाराचा गाडा व्यवस्थित चालून ते आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावेत. म्हणून लोकनेते स्व. सुंदरराव सोळंके यांनी जिल्ह्यात साखर उद्योगाला चालना देत जिल्ह्यातील चार साखर कारखान्याच्या उभारणीत सिंहाचा वाटा उचलला. तसेच जिल्ह्यातील शेतजमिनी सिंचनाखाली आणण्यासाठी त्यांचे खूप मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन आ. सोळंके यांनी केले. तेलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभेत आ. सोळंके बोलत होते. व्यासपीठावर व्हा. चेअरमन जयसिंह सोळंके यांच्यासह जयदत्त नरवडे आदीसह कारखान्याचे सर्व संचालक उपस्थित होते.
चेअरमन वीरेंद्र सोळंके यांनी ठरावाचे विषय नियम वाचन केले त्यास सर्वसाधारण सभासदांनी मान्यता दिली. याप्रसंगी आ. सोळंके म्हणाले की, कारखान्याने आगामी आगामी हंगामात दहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. साखर उद्योग केंद्र व राज्य शासनाचा धोरणावर अवलंबून असून साखरेचे भाव वाढू नयेत म्हणून कारखान्यावर अनेक नियंत्रण लावली जातात. केंद्र शासनातर्फे FRP दरवर्षी वाढविली जाते, परंतु त्या प्रमाणात साखरेची MSP वाढत नाहीत. त्याचा आर्थिक फटका साखर कारखान्यांना सहन करावा लागतो. साखर विक्रीचे दर वाढले पाहिजेत मात्र तसे होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.