चेन्नई : सरकार कोरोना वायरस च्या प्रसाराच्या तीव्रतेंशी निपटण्यासाठी युद्ध पातळीवर अनेक पावले उचलत आहेत. याच्या बचावासाठी आणि रोखण्यासाठी जोरदार काम सुरु आहे. तसेच गरीब लोक आणि प्रवासी मजूरांचीही सरकारकडून पूर्ण देखभाल केली जात आहे. तामिळनाडू चे मुख्यमंत्री एडाप्पडी के. पलानीस्वामी यांनी मंगळवारी सांगितले की, त्यांचे सरकार सध्याच्या वाढवण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे कार्डधारकांना जून च्या महिन्यांमध्ये मोफत रेशन देईल. त्यांनी हेदेखील सांगितले की, प्रवासी मजूर राज्यात अडकले आहेत, त्यांना त्यांच्या गावाकडे लवकरात लवकर पाठवण्याची व्यवस्था केली जात आहे.
राज्यातील लोकांना टेलिविजन वरील एका संबोधनात सांगितले की, ज्यावेळी पहिल्यांदा लॉकडाउनची घोषणा झाली होती, त्यावेळी सरकारने एप्रिल महिन्यासाठी मोफत रेशन देण्याची घोषणा केली होती. पण आता लॉकडाउन 17 मेपर्यंत वाढवण्यात आले आहे, यासाठी सरकार मोफत रेशन वाटण्याचे काम सुरु ठेवणार आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.












