सीतामढी : सितामढी-शिवहर जिल्ह्यासह आसपासच्या अनेक जिल्ह्यांसाठी असलेल्या एकमेव रीगा साखर कारखाना बंद असल्याने येथील ऊस गाळपासाठी नेपाळला नेण्यात येत होता. आता येथील साखरही नेपाळला जात आहे. मात्र, सीमेवरील सुरक्षा रक्षक एसएसबीकडून त्यांना पकडले जात नाही. नेपाळमध्ये ही साखर तस्करी पकडण्यात आली आहे. तस्करांनी सुरक्षा यंत्रणांना चकवा देत मोठ्या कंटेनर ट्रकमध्ये धान्याच्या पोत्यांमध्ये साखर लपवली होती. भारतीय सीमा ओलांडून पलीकडे गेल्यावर भंसार कार्यालयाच्या तपासणीत ट्रक पकडण्यात आला. या साखरेची किंमत सुमारे सहा लाख रुपये आहे. यासोबतच भारतातून नेपाळला सुरू असलेल्या तस्करीचा पर्दाफाश झाला आहे.
या प्रकारावर एसएसबीने काही प्रतिक्रीया दिलेली नाही. दोन्ही कंटेनरमध्ये रिलायन्स ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट कंपनी हरिवन सर्लाहीच्या नावावर भारतातून धान्य आयात केले जात होते. भंसारच्या अधिकाऱ्यांनी संशयावरुन भारतीय ट्रकचालक नौशाद व संजय कुमार यांना ताब्यात घेतले. याप्रकरणातील पुरुषोत्तम घिमिरे व दोन्ही चालकांना नऊ लाख रुपयंच्या जामिनावर मुक्त करण्यात आले. दोन्ही ट्रकमधून चोरट्या पद्धतीने साखर लपवून तस्करी सुरू असल्याची माहिती भंसार कार्यालय प्रमुख मुरारी काफ्ले यांना मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.















