थायलंडमध्ये ऊस शेतकर्‍यांना सरकारकडून दिलासा पॅकेजची घोषणा

बँकॉक : थायलंड ने ऊस शेतकर्‍यांच्या सहायतेसाठी 10 बिलियन (319 मिलियन डॉलर) ची मंजूरी दिली आहे. थायलंड चे ऊस शेतकरी दुष्काळाचा सामना करत आहेत. या पॅकेजमुळे त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ब्राझीलनंतर थायलंड जगातील दुसरा मोठा साखर निर्यातक देश आहे. पण एक वर्षापूर्वी डिसेंबर एप्रिल मध्ये याचे उत्पादन 40 टक्क्यांपेक्षा कमी झाले होते, कारण दशकातला सर्वात मोठा दुष्काळ पडल्यामुळे ही घट झाली होती.

डिप्टी गव्हर्नमेंट चे प्रवक्ता रत्चाडा थानाडाइरेक यांनी सांगितले की, सरकारला आशा आहे की, या दिलासा पॅकेज मुळे जवळपास 3000,000 ऊस शेतकर्‍यांना सहायता मिळेल. थानाडाइरेक यांनी सांगितले की, ऊस शेतकर्‍यांना यावर्षी दुष्काळामुळे अत्यंत वाईट पद्धतीने प्रभावीत केले. आणि त्यांना प्रति टन उत्पादनासाठी अधिक मूल्य लावले होते. सरकारला ऊस शेतकर्‍यांबद्दल सहानुभूती आहे. पुढच्या हंगामात थायलंड च्या ऊस उत्पादनात जवळपास 20 टक्के घट होण्याची शक्यता आहे. उद्योग मंत्रालयाने कॅबिनेट कडून ऊस शेतीच्या समर्थनार्थ 10.2 बिलियन -बाहत च्या आगाऊ पैसे देण्यास मंजूरी देण्याची मागणी केली होती. महामारी आणि दुष्काळामुळे ऊस शेतकर्‍यांचे खूप नुकसान झाले आहे. ज्यासाठी सहायतेची गरज होती. थायलंड जगातील चौथा सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे आणि ब्राजील नंतर दुसरा सर्वात मोठा निर्यातक आहे.

Audio Player

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here