बेळगाव (कर्नाटक): हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखाना सीमाभागातील ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचाऱ्यांसाठी वरदान ठरला आहे. बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याला उज्वल भविष्य असल्याचे प्रतिपादन राज्य सहकार खात्याचे सचिव के. एच. एम. कुमार यांनी केले.
सचिव कुमार यांनी कारखान्याला भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. कारखान्याचे अध्यक्ष एम. पी. पाटील यांनी सचिव के. एच. एम. कुमार यांचे स्वागत केले. कारखान्यातील विविध विभागांसह उत्पादन युनिट आणि विकासकामांची पाहणी करून त्यांनी माहिती घेतली. के. एच. एम. कुमार म्हणाले, हालसिध्दनाथ बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची माहिती मिळाली होती. मात्र जोल्ले दाम्पत्याच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने अल्पावधीत प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली असल्याचे दिसते.
केवळ ऊस गाळप, साखर उत्पादनापलीकडे अन्य उपपदार्थ निर्मितीसह इथेनॉल, वीज निर्मिती, विस्तारीकरण आदी बाबी कारखाना व शेतकरी हितासाठी अत्यावश्यक आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी सहकार खात्याचे सहनिबंधक सुरेश गौडा, उपनिबंधक रवींद्र पाटील, सहायक निबंधक बाहुबली हंजे, उपाध्यक्ष पवन पाटील, संचालक आप्पासाहेब जोल्ले, विश्वनाथ कमते, अविनाश पाटील, रामगोंडा पाटील, समीत सासणे, प्रकाश शिंदे, जयकुमार खोत, जयवंत भाटले, रमेश पाटील, रावसाहेब फराळे, शरद जंगटे, विनायक पाटील, श्रीकांत बन्ने, सुहास गुग्गे, महालिंग कोठीवाले, रामगोंडा पाटील, देवप्पा देवकाते, आर. एल. चौगुले, व्यवस्थापकीय संचालक आप्पासाहेब शिरगावे यांच्यासह संचालक, कर्मचारी उपस्थित होते.
















