देशात ऊसाचे बंपर उत्पादन होत आहे. साखरेची निर्यात आणि उत्पादनामध्ये भारत अग्रस्थानी आहे. शेतकरीही ऊस पिक लागवडीसोबत जोडले गेले आहेत. अनेकवेळा कमी उत्पादनाचे संकट, किड-रोगाची समस्या, सिंचनाचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकते. मात्र, आता ऊसाचे नवे पिक विकसित झाले आहे. त्यापासून उत्पादन जादा होईल. तर किड, रोगांची समस्याही खूप कमी होईल. उसाच्या या नव्या प्रजातीमुळे शेतकरी खुश आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नव्या पिकामुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल.
एबीपी लाईव्हमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमांतर्गत (युएनडीपी) राज्य सरकारच्या केरळ मिशन योजनेने ऊस पिकाचे दीर्घकाळ परिक्षण केले. युएनडीपीने को ८६०३२ या पिकाचे यशस्वी परीक्षण केले आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, को ८६०३२ या प्रजातीला कमी पाण्याची गरज पडते. सिंचन कमी झाल्याने शेतकऱ्यांचा पाण्याचा खर्चही कमी होईल. पिकाचे किडींमुळे होणारे नुकसान कमी होते. हे पिक किडींसोबत लढण्यास सक्षम आहे. प्रतिरोधक क्षमता अधिक असल्याने शेतकऱ्यांना कमी बियाणे, कमी खाद्य लागणाऱ्या चांगल्या पिकाचा फॉर्म्युला सापडला आहे.


















