भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण वाढत चालले आहेत. देशभरात ओम्रिकॉन व्हेरियंटचे नवे ३३ रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि दिल्लीत आतापर्यंत हे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक १७ रुग्ण आढळले आहेत.
कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात सात नव्या रुग्णांचा आढळ झाला आहे. त्यानंतर येथील एकूण रुग्णसंख्या १७ झाली आहे. तर राजस्थानात नऊ रुग्ण आढळले. कर्नाटकमध्ये दोन तर गुजरातमध्ये ३ रुग्ण आहेत. यासोबतच दिल्लीतही दोन रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सात नवे रुग्ण आढळले असून त्यातील चार मुंबईथील आहेत. तर उर्वरीत तीन पिंपरी चिंचवड भागातील आहेत. सात नव्या रुग्णांपैसी तीघेजण टांझानिया, युके आणि आफ्रिकेतून परतले आहेत. तर चार रुग्ण नायजेरियातील आहेत. यामुळे सरकारने खबरदारीचे उपाय लागू केले आहेत. मुंबईत कलम १४४ लागू करून सर्व सभा, रॅलीवर बंदी घालण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी जगभरातील ५९ देशांत ओम्रिकॉनचे रुग्ण आढळल्याचे सांगितले. तर लोकांनी मास्कचा वापर करावा असा इशारा डब्ल्यूएचओने दिला आहे.









