सातारा : अजिंक्यतारा-प्रतापगड साखर उद्योग समूहाच्या प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम जोमाने सुरू आहे. गाळपास आलेल्या उसाला प्रतिटन ३ हजार रुपये याप्रमाणे होणारी सर्व रक्कम कारखान्याने संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केल्याची माहिती उद्योग समूहाचे मार्गदर्शक आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे.
अजिंक्यतारा-प्रतापगड साखर उद्योग समूहाच्या माध्यमातून जावली तालुक्यातील बंद अवस्थेत असलेला प्रतापगड कारखाना या हंगामापासून सुरू करण्यात आला आहे. या कारखान्याचा गळीत हंगाम जोमाने सुरु असून दि. ५ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत २४ हजार ७५५ टन उसाचे गाळप झाले. या गाळप उसाला प्रतिटन ३ हजार रुपये याप्रमाणे होणारी ऊस बिलाची ७ कोटी ४२ लाख ६७ हजार ५६८ रुपये एवढी रक्कम संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी नोंद केलेला संपूर्ण ऊस प्रतापगड कारखान्याला घालून हंगाम यशस्वी करण्यासाठी आणि प्रतापगड कारखाना पुन्हा सक्षम होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रराजे यांनी केले आहे.











