सांगली : पूर्वी या परिसरात उसाचे एकरी उत्पादन ५० ते ५५ टन होते. मात्र आता ते कमी झाले आहे. त्यामुळे राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी योजना राबविण्यात येत आहेत. कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील यांनी केले. साखर कारखान्याच्यावतीने ऊस उत्पादक शेतकरी प्रशिक्षण शिबिरात बोलत होते. संचालक दीपक पाटील, रामराव पाटील, अमरसिंह साळुंखे, जयसिंग पाटील, बाळासाहेब पाटील, प्रशांत पाटील, पी. टी. पाटील, अमोल कुंभार, डी. एल. पाटील, जोतिराव माळी, पी. जी. पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. कारखान्याच्यावतीने ऊस उत्पादनवाढीच्या इटकरे, वशी, कुरळप व करंजवडे येथे आयोजित शिबिरांना शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला.
यावेळी पाटील यांनी कारखान्याच्या वतीने ठिंबक सिंचन योजना, क्षारपड जमीन सुधारणा, सेंद्रिय व जैविक खते शेतकऱ्यांना कमीत कमी किंमतीत दिली जात असल्याचे सांगितले. दिलीप पाटील यांनी स्वागत केले. सुरेश पाटील, बाबासो पवार, संदीप पवार, यशवंत बावचकर, इकबाल जमादार, वसंतराव यादव, सचिन माने, रोहित देवकर, गणपतराव पाटील, इकबाल मुलाणी, योगेश पाटील, जयदीप देवकर, दिलीप जाधव, अनंत पाटील, दिनकर पाटील, बाबासो पाटील, बाजीराव पाटील, विजय पाटील, श्रीकांत पाटील, संदीप मदने आदी उपस्थित होते. संचालक अमरसिंह साळुंखे यांनी आभार मानले.











