हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
युगांडा लिमिटेड आणि काकिरा हे प्रचंड क्षमतेचे साखर कारखाने यंत्रांच्या नैमित्तिक देखभालीसाठी तात्पुरते बंद ठेवले असल्याने युगांडातील ऊस शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे .
ऊसाची कारखान्याकडून उचल न झाल्याने बुसोगा परगाण्यातील ऊस उत्पादकांनी केनयात ऊसाची निर्यात करण्याच्या दृष्टीने युगांडा सरकारकडे आवेदन दिले होते. मात्र सरकारची या प्रस्तावाला मंजुरी नसल्याची माहिती युगांडाचे उद्योगमंत्री अमालिया क्यांबाडे यांनी दिली. युगांडातील ऊसावर प्रक्रिया करण्यात देशाचे साखर कारखाने सक्षम आहेत अशीही त्यांनी पुस्ती जोडली. मात्र या वर्षी, पाच लाख मेट्रीक टन अधिक उस झाल्याने बहुतांश शेतकरी आपले पिक पूर्णपणे विकू शकलेले नाहीत.











