लंडन : ब्रिटनमधील साखर उत्पादन प्रतिकूल हवामानामुळे आधीच्या तुलनेत अपेक्षेपेक्षा कमी होईल, अशी शक्यता असल्याचे ब्रिटिश शुगरने म्हटले आहे. असोसिएटेड ब्रिटिश फुड्सच्या एका बीट शुगर प्रोसेसरने सांगितले की, या वर्षी साखर उत्पादन आता ०.७४ टन होईल असे अनुमान आहे. यापूर्वी गृहीत धरलेल्या ०.९ मिलियन टन उत्पादनापेक्षा आणि गेल्या हंगामातील १.०३ मिलियनच्या पुर्वानुमानापेक्षा खूप कमी आहे.
अहवालात म्हटले आहे की, खास करुन अलिकडेच प्रतिकूल हवामानाच्या स्थितीनंतर बीटची कमी उत्पादकता दिसून येत आहे. ब्रिटनच्या हवामान विभागाच्या माहितीनुसार, डिसेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यात २०१० नंतर सर्वाधिक थंडीची सुरुवात झाली होती. शेतकऱ्यांनी सांगितले की, थंडीच्या हवामानामुळे बीटच्या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.












