शामली : उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात सदर विभागातील एका साखर कारखान्यात टर्बाइनचा जॉईंट लीक झाल्यामुळे दोन कर्मचारी जखमी झाले. साखर कारखान्याच्या एका अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, पहाटे तीन मेगावॅटच्या टर्बाइनचा जॉईंट अचानक लीक झाला. या अपघातात दोन कर्मचारी जखमी झाले. कर्मचाऱ्यांना टर्बाइनच्या आतील ज्वाळांमुळे जखमा झाल्या. त्यानंतर ऊस गाळप अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे. सद्यस्थितीत जखमी कर्मचाऱ्यांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.












