अमरोहा : ऊस पिकावर संपूर्ण हंगामात जवळपास डझनभर किडींकडून नुकसान करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, टॉप बोरर ही कीड उसाची सर्वात मोठी शत्रू आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या किडीने गेल्या वर्षभरात ऊसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. या वेळीही ऊस पिकाचे किडींकडून नुकसान केले जात आहे. सध्या ठिकठिकाणी ऊसाची लागवड केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
याबाबत लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सध्या उसाची लागवड करण्याचा हंगाम सुरू आहे. गव्हाच्या कापणीनंतरही ऊसाची पेरणी केली जाते. या काळातील ऊस लागवडीला योग्य कालावधी मानला जातो. फेब्रुवारी महिन्यात उसाची लागवड करण्यात आली. ती रोपे आता चांगली वाढली आहेत. शेतकरी आता सिंचन, खुदाई करीत आहेत. मात्र, ऊस पिकावर टॉप बोरर किडींच्या हल्ल्याची भीती सतावू लागली आहे. त्यामुळे उसाची रोपे पिवळी पडत आहेत. आतापासूनच पिकावर रोग वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे असेआहे की, खरेतर अशा हवामानात ऊसावर कोणत्याही प्रकारच्या रोगाचा फैलाव होत नाही. मात्र, यावेळी आतापासूनच रोगाचा फैलाव होत आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात अडचणी आणखी वाढतील.











