बागपत : वकिलांनी शुक्रवारी तहसील कार्यालय परिसरात ऊस बिले देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. मलकपूर साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना ऊस बिले मिळाली नसल्याने संतप्त वकिलांनी तहसील कार्यालयात घोषणाबाजी केली. यावेळी उप जिल्हाधिकारी सुभाष सिंह यांना निवेदन देवून तातडीने बिले देण्याची मागणी करण्यात आली.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, वकिलांनी जसवीर राणा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. मलकपूर साखर कारखाना शेतकऱ्यांना उसाचे पैस देत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याचे सांगण्यात आले. वकिलांनी सांगितले की, जर लवकर पैसे मिळाले नाहीत, तर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल. यावेळी अमित वशिष्ट, राममेहर सिंह, सत्यपाल, गौरव तोमर, तेजवीर सिंह, सागर तोमर, विनीत प्रधान, विकास तोमर आदी उपस्थित होते.












