सहारनपूर : जिल्ह्यात सध्या विविध साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची बिले थकीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्याच्यासह आपल्या विविध मागण्यांचे मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन राष्ट्रीय लोक दलाने प्रशासन अधिकऱ्यांकडे सुपूर्द केले.
लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ग्रामीण भागात विजेचा कमी दाबाने पुरवठा होत आहे. परिणामी कुपनलिका आणि इतर उपकरणे सुरू होत नाहीत. विजेची व्यवस्था सुरळीत करण्यासह कमी दाबाने वीज मिळण्याची समस्य सोडवावी अशी मागणी करण्यात आली. ग्रामीण भागातील वीज कपात बंद करून २४ तास अखंड वीज पुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज पुरवठा सरकारने करावा याकडेही लक्ष वेधण्यात आले.
निवेदन देताना राष्ट्रीय लोक दलाचे जिल्हा महासचिव चौधरी धीर सिंह, अनुज वर्मा, चौधरी गजेंद्र सिंह, चौधरी अतुल फंदपुरी, शाहनवाज, चाँद, भूषण चौहान, भुरा मलिक, मोहम्मद नौशाद आदी उपस्थित होते.












