बागपत : जिल्ह्यातील वकिलांनी बुधवारी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी मलकपूर साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना ऊस बिले दिली नसल्याबद्दल नायब तहसीलदार अतुल रघुवंशी यांना निवेदन देण्यात आले.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ॲड. जयवीर सिंह राणा यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात आलेल्या वकिलांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घोषमाबाजी केली. ऊस बिले दिली नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी येत आहेत. याबाबत वकिलांनी तहसील कार्यालयासमोर १० दिवस आंदोलन केले होते. त्यानंतर कारखान्याने गेल्या वर्षीची ऊस बिले दिली. आता यावर्षीची बिले दोन महिन्यात दिली नाहीत, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी अमित वशिष्ठ, संजीव दांगी, राममेहर सिंह आदी उपस्थित होते.












