लखनौ : उत्तर प्रदेश ऊस विभागाने वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी राज्यातील ४६ लाखाहून अधिक शेतकऱ्यांसाठी मिनी ऊस बियाणे किट बुकिंग करण्यासाठी एक ऑनलाइन प्रणाली सुरू केली आहे. राज्यातील ऊस आणि साखर उद्योगाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांनी सांगितले की, ही प्रणाली अशा शेतकऱ्यांच्या गरजांची पुर्तता करण्यासाठी आहे, ज्यांना एक डोळा पद्धतीचे बियाणे वितरणात पारदर्शकतेची हमी मिळते.
ऊस विभागाने ४ मार्च रोजी शाहजहांपूर येथील युपी ऊस संसोधन परिषदेत (UPCSR) आयोजित करण्यात आलेल्या ‘मिठास मेळा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिनी कीटचे वितरण सुरू केले जाणार आहे. भुसरेड्डी यांनी सांगितले की, मिनी कीटच्या मआध्यमातून ऊसाच्या दोन नव्या प्रजातीचे वाण CoS १७२३१ आणि CoS १६२३३ यांचा सहभाग असेल. हे दोन्ही वाण उच्च उत्पादन देणारे आणि चांगले रोगप्रतीकारक शक्ती असलेले आहेत.













