ओमाहा : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या नवीन व्यापार करारानुमुळे युनायटेड किंग्डमला इथेनॉल निर्यात करताना अमेरिकेचे निर्यात शुल्क १९% वरून शून्यावर येईल, असे म्हटले जात आहे. व्हाईट हाऊसने म्हटले आहे कि, नव्या करारात इथेनॉल, गोमांस, धान्ये, फळे, भाज्या, पशुखाद्य, तंबाखू, शीतपेये, शेलफिश, कापड, रसायने, यंत्रसामग्री आदी समाविष्ट आहे. या करारात $700 दशलक्ष पेक्षा जास्त इथेनॉल निर्यात आणि $250 दशलक्ष पेक्षा जास्त इतर कृषी उत्पादनांचा समावेश आहे.
ट्रम्प म्हणाले कि, नव्या करारामुळे अमेरीकन कृषी उत्पादनांना युकेच्या बाजारपेठेत विनाअडथळा सहज प्रवेश मिळू शकणार आहे. करारानुसार, यूएस इथेनॉलवरील शुल्क १९% वरून शून्यावर येईल,असे कृषी सचिव ब्रुक रोलिन्स यांनी व्हाईट हाऊसच्या कार्यक्रमात सांगितले. यूएसडीएच्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये अमेरिकेने यूकेला ५३५ दशलक्ष डॉलर्सचे इथेनॉल निर्यात केले, ज्यामुळे इथेनॉल यूकेला सर्वोच्च कृषी निर्यात उत्पादन बनले. आम्ही अजूनही कराराच्या विशिष्ट तपशीलांची वाट पाहत असून आम्हाला बाजारपेठेतील विस्तारित प्रवेशाच्या शक्यतांबद्दल उत्सुकता आहे. ज्यामुळे आमच्या शेती अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे रिन्यूएबल फ्युएल्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि सीईओ जेफ कूपर म्हणाले.