भारताने इथेनॉल, डीडीजीएस आयातीला परवानगी देण्यासाठी अमेरिकेचा आग्रह

पुणे : अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये द्विपक्षीय व्यापार कराराच्या वा कराराच्या वाटाघाटी सुरू आहेत. आपल्या शेतीमालाला भारताची बाजारपेठ खुली करावी, यावर अमेरिकेचा जोर आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारताची बाजारपेठ अमेरिकेतील मका उत्पादक शेतकऱ्यांना खुणावत आहे. भारताने अमेरिकेच्या इथेनॉल आणि डीडीजीएस आयातीला परवानगी द्यावी, यासाठी अमेरिका सरकारने आग्रही भूमिका घेतली आहे. अमेरिकेची ही मागणी भारताने मान्य केली तर मका आणि सोयाबीनच्या दरावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे, असे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटले आहे. अमेरिकेने आयात शुल्क हटविण्यासाठी दबाव वाढवला आहे. तसे झाले तर भारतात मक्याचे दर पडण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे स्वस्त डीडीजीएस भारतात आयात झाल्यास सोयापेंड बाजारावरील दबाव आणखी वाढण्याची भीती आहे. ज्वारीसाठीही अमेरिकेने दबाव वाढला आहे.

याबाबत ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, देशात इथेनॉलमुळे मक्याला मागील दोन वर्षांपासून चांगली झळाळी आली आहे. या बाजारपेठेत शिरकाव करण्याचा प्रयत्न अमेरिकेचा आहे. अमेरिकन शेतकरी भारतीय इथेनॉल बाजारपेठेसाठी लॉबिंग करीत आहेत. इथेनॉल आणि डीडीजीएसची विक्री करण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. सध्या भारतात इथेनॉल आयातील परवानगी नाही. इंधनाव्यतिरिक्त इतर वापरासाठी इथेनॉलवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क आहे. भारताने इथेनॉल विषयक धोरण बदलून पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी अमेरिकेतून इथेनॉल आयात करावे, अशी मागणी अमेरिकेची आहे. डीडीजीएस आयातीलाही परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. भारताने २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट वेळेआधी साध्य केले आहे. आता २०३० पर्यंत ३० टक्के इथेनॉलचे मिश्रण ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. भारतात मक्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळे पशुखाद्य उद्योग मक्याला पर्याय शोधत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने नॉन जीएम ज्वारी निर्यातीचा प्रस्ताव ठेवला आहे अशी माहिती आयग्रेन इंडियाचे संचालक राहुल चौहान यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here