उत्तर प्रदेश : सिंभावली साखर कारखाना बंद पडल्याने ७०० कर्मचारी अडचणीत

बहराईच : सिंभावली साखर कारखान्याच्या दिवाळखोरीनंतर, कारखान्याचे कर्जदार आता चिंतेत आहेत. कारखान्यात कार्यरत ७०० कर्मचारीदेखील अडचणीत आले आहेत. या कारखान्याचे संपूर्ण ऊस क्षेत्र इतर साखर कारखान्यांना वाटप करण्यात आले आहे. चालू हंगामात कारखान्याचे कामकाज बंद करण्यात आले आहे. जर कारखाना सुरूच राहिला नाही तर कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन कसे मिळेल? असा सवाल सिंभावली साखर कारखाना कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस दिनेश सिंग यांनी केला. कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा निषेध करण्याशिवाय पर्याय नाही असे ते म्हणाले.

सिंभावली कारखान्यात १०२ नियमित कर्मचारी असून २९८ हंगामी कायम कर्मचारी आहेत. तर इतर ३००
कामगार काम करतात. सिंभावली कारखाना दुहेरी कर्जात अडकल्याचे जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांकडील थकीत रक्कम आणि बँका, गैर-तारण संस्थांकडून घेतलेल्या कर्जाचा बोजाही कारखान्यावर आहे. शेतकऱ्यांचे १०४ कोटी रुपये थकीत आहेत. विविध सेवा पुरवठादार, रासायनिक पुरवठादार आणि बँकांकडेही मोठ्या प्रमाणात कर्जे प्रलंबित आहेत. नवी दिल्ली येथील एनसीएलटी (नॅशनल कंपनी लॉ अपील ट्रिब्यूनल) येथे दिवाळखोरी निवारण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच याबाबत तडजोड शक्य होईल. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ ऑक्टोबर रोजी होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here