उत्तर प्रदेश : गैरप्रकार टाळण्यासाठी ऊस खरेदी केद्रांवर प्रशासनाचे लक्ष

हरदोई : जिल्ह्यात चार साखर कारखाने कार्यरत आहेत. त्यांचा ऊस गाळप हंगाम धडाक्यात सुरू झाला आहे. बघौली, रुपापूर, लोणी आणि हरियाणवा येथे हे साखर कारखाने असून यापैकी तीन कारखाने खाजगी क्षेत्रातील आहेत. सध्या ऊस खरेदी आणि बिले प्रशासकीय देखरेखीखाली दिली जात आहत. यासाठी लोणी, हरियाणवा आणि रुपापूरमध्ये प्रत्येकी २९ आणि बघौलीमध्ये २७ खरेदी केंद्रे उघडण्यात आली आहेत. लोणीमध्ये २८,३०५ हेक्टर, हरियाणवामध्ये ५७,१४२ हेक्टर, रुपापूरमध्ये २०,१०१४ हेक्टर आणि बघौली परिसरात सुमारे ६७७५ हेक्टर शेती क्षेत्रात ऊस लागवड करण्यात आली आहे. केंद्रांवर ऊस खरेदी सुरू होताच जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. गेल्यावर्षी कमी वजन करून फसवणुकीचे आरोप झाले होते. शिवाय, अनेक खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडून खंडणीचे प्रकारही नोंदवले गेले होते. तसे घडू नये यासाठी जिल्हा ऊस विभागाला देखरेख करण्याचे काम सोपवण्यात आले आहे.

सध्या शेतकऱ्यांना थेट ऊसाच्या पावत्या मिळतील आणि त्यांच्या मोबाईलवर एसएमएस संदेश देखील पाठवले जातील असे नियोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा ऊस अधिकारी निधी गुप्ता यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, ऊसाच्या पावत्या देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. पिक सर्वेक्षणादरम्यान शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. त्यांचे मोबाईल क्रमांक रेकॉर्ड केले जातात आणि या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवले जातील. शेतकऱ्यांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरील मेसेज बॉक्स रिकामा ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकातील कोणत्याही त्रुटी दुरुस्त करण्याची संधीदेखील दिली जात आहे. त्यांनी शेतकऱ्यांना वजनात कोणत्याही विसंगतीची तक्रार करण्याचे आवाहन केले. दरम्यान, भाकियूचे नेते रवींद्र सिंह चौहान यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी खरेदी केंद्रांवर गुप्त छापे टाकावेत. अधिकाऱ्यांनी अचानक छापे टाकले आणि परिस्थितीची चौकशी केली तर सत्य उघड होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here