कुशीनगर : कुशीनगर जिल्ह्यातील भाजीपाला लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी उसामध्ये आंतरपीक घेऊन चांगले उत्पन्न मिळवले आहे. हाटा विकास गटातील शेतकरी राजू चौधरी यांनी एक एकर उसातून ५० हजार रुपयांची भेंडी विकली आहे. शेतकऱ्याने सांगितले की, ०११८ या उसाच्या जातीची लागवड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात खंदक पद्धतीने १२० सेमी अंतरावर केली. सोबत भेंडी पिक घेतले. साधारणतः ३५ ते ४० दिवसांनंतर भेंडी उत्पादन मिळू लागले. सुरुवातीला भेंडी ४० ते ५० रुपये प्रति किलो दराने विकली जात होती. मार्च आणि एप्रिलमध्ये ती ३० ते ४० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहेत.
हिंदूस्थानमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार,सध्या भेंडी २० ते २५ रुपये प्रति किलो दराने विकली जात आहेत. गोरखपूरमधील पिपराईच येथील उत्तर प्रदेश ऊस शेतकरी संस्था प्रशिक्षण केंद्राचे माजी सहाय्यक संचालक ओम प्रकाश गुप्ता यांनी शेतकरी राजू चौधरी यांच्या शेताला भेट दिली आणि चर्चा केली. त्यांनी सांगितले की त्यांनी सुमारे दीड एकर जमिनीवर ऊस पेरला आहे. पूर्ण शेतात सोबत भेंडी पिक घेतले आहे. आता इतके उत्पादन झाले आहे की, भेंडी तोडतासुद्धा येत नाही. दररोज अर्ध्या एकर शेतातून भेंडी तोडत आहेत. दर तीन दिवसांनी ते तोडणी करतात. त्यांनी भेंडी विक्रीतून एक नवीन मोटारसायकल खरेदी केली आहे. आतापर्यंत ५० हजार रुपयांची भेंडी विकली आहे. जूनपर्यंत भेंडी विक्री सुरू राहिल.