लखनौ : उत्तर प्रदेश सरकारच्या 31 ग्रीनफिल्ड अल्कोहोल डिस्टिलेशन प्रकल्पांमध्ये तब्बल 5,400 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक झाली आहे. नवीन प्लांट्सची एकूण एकत्रित अल्कोहोल डिस्टिलेशन क्षमता 1.45 अब्ज लीटर आहे. त्यापैकी 18 प्लांट्सनी आतापर्यंत 968 दशलक्ष लिटर क्षमतेचे व्यावसायिक उत्पादन सुरू केले आहे. शिवाय, 31 ग्रीनफिल्ड प्रकल्पांमध्ये 8,267 लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची क्षमता आहे. प्रस्तावित प्रकल्पांमध्ये यापूर्वीच 3,530 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
अल्कोहोल क्षेत्राचा ऊस आणि इथेनॉल यांच्याशी कृषी रोड मॅपचा एक भाग म्हणून संबंध आहे. अल्कोहोलचा वापर सौंदर्य प्रसाधने आणि फार्मास्युटिकल उद्योगांसह विविध औद्योगिक उत्पादनांमध्ये केला जातो. राज्यातील विद्यमान 38 डिस्टिलरींनीही गेल्या चार वर्षात त्यांची उत्पादन क्षमता 592 दशलक्ष लिटरने वाढवली आहे. राज्याची एकत्रित मद्य उत्पादन क्षमता वार्षिक तीन अब्ज लिटर पेक्षा जास्त आहे. यामुळे कृषी क्षेत्राला चालना मिळून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि अन्न प्रक्रिया उद्योगांनाही चालना मिळणार आहे.












