उत्तर प्रदेश : ऊस पिकावर पोक्का बोईंगचा फैलाव, योग्य काळजी घेण्याचा कृषी तज्ज्ञांचा सल्ला

बाराबंकी : जुलै ते सप्टेंबर यांदरम्यान, ऊस दर आठवड्याला सुमारे ४ ते ५ इंच वेगाने वाढतो. हा असा काळ आहे जेव्हा पिकात रोगांचा धोकादेखील जास्त असतो, म्हणून या पावसाळ्यात ऊस पिकात या गोष्टींचा वापर केल्यास रोगांपासून आराम मिळेल आणि पीक उत्पादन वाढेल असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

न्यूज 18 हिंदीमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, जिल्हा कृषी अधिकारी रजितराम यांनी सांगितले की, शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करतात. पावसाळ्यात ऊस पिकाला पोक्का बोइंग आणि लाल सड या दोन रोगांचा प्रादुर्भाव होतो. हे रोग मुळापासून पिकाचा नाश करू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होऊ शकते. तथापि, जर शेतकऱ्यांनी पावसाळ्यात ऊस पिकात काही गोष्टींचा वापर केला तर पिकाला या आजारांपासून वाचवता येते.

पावसाळ्यात ऊस पिकाची वाढ जलद होते. परंतु त्याच वेळी ऊस पडण्याचा धोकादेखील वाढतो. अशा परिस्थितीत, शेतात माती टाकणे आणि रोपे बांधणे खूप महत्वाचे होते. हे काम तेव्हाच करावे जेव्हा मातीमध्ये पुरेसा ओलावा असेल. माती लावल्याने झाडांची मुळे मजबूत होतात, तर बांधल्याने झाडे सरळ उभी राहतात. त्यामुळे पीक मजबूत, सरळ आणि रोगांपासून सुरक्षित राहते, त्यामुळे उत्पादनातही वाढ होते. पोक्का बोईंग रोग हा उसाचा एक धोकादायक रोग आहे, जो पांढऱ्या बुरशीमुळे पसरतो. लाल सड अर्थात रेड रॉट रोग देखील खूप हानिकारक ठरतो. पोक्का बोईंग रोखण्यासाठी ऊस पिकावर ०.२ टक्के कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा ०.१ टक्के बाविस्टिनची फवारणी करावी. तर रेड रॉट रोग रोखण्यासाठी ०.१ टक्का थायोफेनेट मिथाइल, कार्बेंडाझिम किंवा टिबुकोनाझोलची २-३ वेळा फवारणी फायदेशीर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here