लखीमपुर खीरी : लखीमपूरमधील जिल्ह्यातील शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत. दररोज आकाश ढगांनी व्यापले आहे, पण पाऊस पडत नाही. दमट उष्णतेमुळे जमीन कोरडी होत असून ऊस पिक वाळत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतांना वारंवार पाणी द्यावे लागते. ते जमेल तसे त्यांच्या पिकांना पाणी देतात. पण पाणी दोन दिवसांत सुकते. वारंवार पाणी दिल्याने आर्थिक नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
चांगल्या ऊस उत्पादनासाठी पावसाचे पाणी आवश्यक आहे. जर लवकर पाऊस पडला नाही तर पिकाचे मोठे नुकसान होऊ शकते. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर होईल. यावर्षी अद्याप या परिसरात पावसाने दडी मारली आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम ऊस पिकावर झाला आहे. आणखी काही दिवसांत पाऊस झाला नाही तर पिक वाळू शकते. शेतकऱ्यांनी या पिकाला जास्तीत जास्त पाणी देण्याचा प्रयत्न चालवल आहे.












